पाडलोसमध्ये उद्या ‘जल्लोष’ कार्यक्रम

बांदा, दि .१७ फेब्रुवारी
पाडलोस गाव व्हॉटस्अप ग्रुप आयोजित शिवजयंती निमित्त ‘जल्लोष 2024’ चे आयोजन दि. 19 फेब्रुवारी रोजी संध्या.7 वा. पाडलोस देव रवळनाथ मंदिर जवळ करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी 8.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. मुलांची भाषणे, महिलांचे कार्यक्रम, मिरवणूक आदी कार्यक्रम होणार. त्यानंदर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील.
यावेळी होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा), संगीत खुर्ची (पुरुष व महिला गट), वेशभूषा स्पर्धा (लहान व मोठा गट) आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोसच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पाडलोस गाव व्हॉटस्अप ग्रुपतर्फे ‘जल्लोष’मध्ये चषक व पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच पाढे पाठांतर स्पर्धेतील क्रमांक प्राप्त पहिल्या तीन विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पाडलोस गाव व्हॉटस्अप ग्रुप अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर यांनी केले आहे.