आंबोली गावचा कबूलयतदार गावकर जमीन प्रश्न बाबत आव्हान

सावंतवाडी,दि.१७ फेब्रुवारी 
आंबोली गाव कबूलयतदार जमीन प्रश्न सोडवण्यासाठी गेली कित्येक वर्षे येथील प्रमुख गावकर मंडळी वेग वेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहेत.सदर प्रश्न सुटवा या साठी न्यायालयीन लढाई सुरु होती व आहे.
तसेच प्रशासकीय व राजकीय पातळी वर सुद्धा याचा पाठपुरावा नेहमीच सुरु असतो. तसेच शासनाने निर्णय देखील घेतला आहे असे समन्वयक समितीने म्हटले आहे.

आंबोली गावाने हा प्रश्न सुटावा या साठी मूळ कबूलयतदार गावकर कुटुंबातील प्रत्येक वाडीतील काही व्यक्तींची नियुक्ती करून एक सर्वानुमते ” कबूलयतदार गावकर समन्वय व कृती समिती स्थापन ” केली आहे.व ही समिती राजकारण विरहित काम करत आहे. व या समितीत आंबोली तील राजकारण विरहित व्यक्ती व त्याच सोबत सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते स्वतः चे रजकारण व पक्ष बाजूला ठेवून एक मताने काम करत आहेत.

कबूलयतदार गावकर समन्वय व कृती समिती ने केलेल्या आतापर्यंत च्या योग्य नियोजन मुळेच शासनाने आंबोली तील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण केले. व त्या बाबत आंबोली तील मूळ ६५४ कुटुंबाना गेल्या वर्षी मान्यता देऊन एक प्रकारे या समितीने केलेल्या कार्याची पोच पावती दिली.आंबोली तील जमिनी ह्या येथील मूळ कबुलायतार वहीवटदार यांच्याच आहेत व फक्त त्यांनाच त्या परत देण्यासाठी शासन स्तरावर पुढील कार्यवाही सुरु आहे.असे असताना काही लोक हेतूपुरस्कार ज्यात काही असे लोक आहेत कि जे या मूळ कबूलयतदार कुटुंबातील देखील नाही आहेत ते परस्पर संपूर्ण वस्तुस्थिती ची शहाणीषा न करता अशा बातम्या प्रसारित करत आहेत कि त्यामुळे मूळ ६५४ कुटुंब तील लोकांना इतर वन व महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनी परत घेताना कायदेशीर व तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते, असे समितीने म्हटले आहे .

आंबोली गाव कबूलयतदार गावकर समन्वय व कृती समिती चे मत विचारल्या शिवाय कोणाच्याही सांगण्यावरून आंबोली कबूलयतदार गावकर जमिनी बाबत मग ती जमीन सद्या महसूल विभागाच्या ताब्यात असो अथवा वन विभागाच्या ताब्यात असो त्या बाबत कोणतीही बातमी प्रसारित करू नये.
अशी कोणतीही बातमी कबूलयतदार गावकर समन्वय व कृती समिती चे मत विचारात घेतल्या शिवाय प्रसारित केली व त्या मुळे सद्या शासन स्तरावर व न्यायालयीन स्तरावर सुरु असलेल्या पाठपुराव्याला सदर बातमी मुळे कोणताही विपरीत परिणाम झाल्यास ज्याने ती बातमी दिली व ज्या प्रसार माध्यमातून ती बातमी प्रसारित केली त्यांना जबाबदार धरण्यात येईल.असे कबूलयतदार गावकर समन्वय व कृती समितीने म्हटले आहे.