युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव…
देवगड,दि .१७ फेब्रुवारी(दयानंद मांगले)
भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित कणकवली विधानसभा मर्यादित नमो चषक २०२४ बुद्धीबळ स्पर्धेत कणकवली देवगड येथील स्पर्धकांनी बाजी मारली असून या स्पर्धेत अभिषेक सांगळे गायत्री राठोड,सुश्रुत नालंग हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले
या उदघाटन माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते दिपप्रजवलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आले.देवगड तालुका भाजप युवा मोर्चा यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे,गौरव यादव भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम,शहर अध्यक्ष दयानंद पाटील,तसेच अन्य भाजप पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका यांच्या हस्ते पार पडला .या वेळी संदीप मेस्त्री व मनोज रावराणे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील विजेते
खुला गट प्रथम क्रमांक :अभिषेक सांगळे रोख रु १००००/- चषक, व्दितीय क्रमांक: संदेश गवंडी रोख रु ५०००/- चषक (दोन्ही देवगड), तृतीय क्रमांक:अक्षय देवलकर (वैभववाडी) ३०००/- चषक , चतुर्थ क्रमांक: आर्यन
हऱयाण रोख रु २०००/- चषक, पंचम क्रमांक : सुयश पेठे (देवगड)रोख रु१०००/- चषक
तसेच जेष्ठ खेळाडू मनोहर घाडी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
१८ वर्षाखालील प्रथम क्रमांक :सुश्रुत नालंग रोख रु ५०००/- चषक व्दितीय क्रमांक :मिहीर सकपाळ (देवगड) ३०००/- चषक तृतीय क्रमांक:वरद तवटे रु २०००/- चषक,चतुर्थ क्रमांक : रोहित सावंत रोख रु १०००/- चषक, पंचम क्रमांक : सात्विक मालंडकर रोख रु १०००/- चषक (कणकवली)
महिला गट • प्रथम क्रमांक : गायत्री राठोड (कणकवली)३०००/- चषक, व्दितीय क्रमांक:तनिष्का आडेलकर (कणकवली)रु २०००/- चषक, तृतीय क्रमांक :मधुरा पाटील( कणकवली) १०००/- चषक, चतुर्थ,क्रमांक :मिलन सुलेभावे रु ७००/- चषक,पंचम क्रमांक : जुई उबाळे (कणकवली)रु ५००/- चषक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सुमारे १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला आहे.सूत्रसंचालन हृतिक धुरी व आभार दयानंद पाटील यांनी मानले.