मालवण राजकोट किल्ला येथे शिवजयंती उत्सव

मालवण,दि .१७ फेब्रुवारी

मालवण येथील सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्यावतीने राजकोट किल्ला मालवण येथे १८ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दि. १८ रोजी सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ तर्फे चित्रकला व रांगोळी स्पर्धा होणार आहे तर दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सौरभ ताम्हणकर मित्रमंडळातर्फे कार सेवकांचा सत्कार या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ मिलिंद कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. तरी या उत्सवात सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सौरभ ताम्हणकर मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.