एसटी कामगार संघटनेचे विभागीय कार्यालयासमोरील आंदोलन स्थगित

कणकवली दि.१७ फेब्रुवारी(भगवान लोके)
मान्यताप्राप्त कामगार
संघटनेने १३ फेब्रुवारीपासून आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी विभाग स्तरावर तसेच मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाची राज्य शासनाने दखल घेऊन २७ फेब्रुवारीला संघटनेसोबत बैठक लावली आहे. तसेच राज्यात सध्या कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली असून विभागस्तरावर सुरू असलेले उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आझाद मैदान मुंबई येथील उपोषणाची व्याप्ती वाढविण्याचाही निर्णय झाल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप साटम यांनी दिली आहे.

२७ रोजीच्या शासन बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलनाची राज्यभर तीव्रता वाढविण्याचा निर्णय झाल्याचे दिलीप साटम यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.