असलदे येथे १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव

कणकवली दि.१७ फेब्रुवारी(भगवान लोके)

ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळ, असलदे गावठण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असलदे चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, रामेश्वर वि.का.स. सोसायटी लि.असलदे चेअरमन भगवान लोके,शेतकरी सहकरी खरेदी विक्री संघ, मर्या. कणकवली संचालक गुरुप्रसाद वायंगणकर
तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर खोत, पोलीस पाटील सावित्री पाताडे उपस्थित राहणार आहेत .

शिवजयंती निमित्त
सकाळी ९ वा.शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन,दुपारी ३ ते ४ वा.महिलांसाठी हळदीकुंकू
सायंकाळी ४ ते ६ वा. फनिगेम्स् (सर्वांसाठी),सायं.७ वाजता मान्यवरांचे स्वागत व दिप प्रज्वलन,७.३० वा.शाळेतील मुलांची भाषणे (शिवचरित्रावर),रात्री ९.३० वा.स्थानिक भजन (असलदे गांवठण) असे कार्यक्रम होणार आहेत.

तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळ, असलदे गांवठण अध्यक्ष दौलत चंद्रकांत परब,सेक्रेटरी शंकर पाटील,
खजिनदार सत्यवान घाडी यांनी केलं आहे.