सावंतवाडी दि.१७ फेब्रुवारी
आंबोली येथील कबुलायतदार गावकर महाराष्ट्र शासन जमिनीत अतिक्रमण करून इमारती उभारल्याप्रकरणी साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी ही सुरू आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट देऊनही शासनाच्या जमिनीत अतिक्रमणे हटविण्याबाबतच्या मागणी बाबतीत चिडीचूप झाले आहेत.
कबुलायतदार गावकर जमिनीत मोठ्या प्रमाणात २३ इमारती उभारल्या आहेत.त्या ठिकाणी रिसॉर्ट बार उभारले जात आहेत. त्या जमिनी बाहेरच्या लोकांनी बळकावल्या असून ग्रामस्थांच्या जमिनी पुन्हा मिळाव्यात यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. आज सायंकाळी पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांनी भेट दिली.मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणीही भेट दिली नाही.याठिकाणी कबुलयातदार गावकर कृती समिती सचिव भूषण गावडे यांनी भेट देऊन चर्चा केली. यावेळी ग्रामस्थ कैलास गावडे,रूपा गावडे,प्रकाश गुरव,राकेश अमृसकर,सद्गुरू राऊत, लिंगराज राऊत,शिवराम गुरव,कांता गुरव,झिला गावडे,संतोष गावडे,रुपाजी गावडे,प्रथमेश गावडे,प्रशांत गावडे,श्री.पेंडसे,रामचंद्र अमृस्कर,प्रदीप गावडे,गंगाराम गावडे,अमित गुरव,अभिजित राऊत,रोहित मेस्त्री,उमेश गावडे,शंकर गावडे, दाजी गुरव तसेच ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
आंबोली मध्ये कबुलायतदार गावकर जमीन स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी कागदोपत्री तसाच शेरा राहिला असल्याने शासनाने प्रत्येकाच्या नावावर जमिनी करण्यासाठी शासन नावावर लावण्यात आल्या आहेत.या जमिनीचे वाटप करण्याबाबतचा शासनाचा निर्णय झाला आहे. मात्र वन संज्ञा, वन म्हणून नोंदी असलेल्या जमिनी बाबत शासनाने निर्णय घेतला नाही त्यामुळे आंबोली मधील जमीन वाटप राहिले आहे.
मात्र कबुलायतदार गावकर जमिनीशी संबंध नसणाऱ्या अनेकांनी या ठिकाणी बांधकामे करून अतिक्रमण केले आहे आणि त्यांना ग्रामपंचायतीने घर नंबर दिले आहे. याबाबतची चौकशी करून ही बांधकामे तात्काळ हटविण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत करून उपोषण सुरू केले आहे. याकडे शासनाने, प्रशासनाने कानाडोळा केला असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.