सावंतवाडी दि.१७ फेब्रुवारी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जाताना रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले स्टॉल आज शेजारील संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत असल्याने हटविण्यात आले.
दरम्यान ही संरक्षक भिंत पुन्हा उभारण्यात येत असल्याने या स्टॉल धारकांनी आज आपले स्टॉल हटविले असल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाताना साईडने आठ ते दहा स्टॉल उभारण्यात आले होते त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात जाता येताना दोन वाहने एकाच वेळी सुटतही नव्हती अधून मधून या स्टॉल बाबत तक्रारी केल्या जात होत्या.
दरम्यान पावसाळ्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात कक्षा कडील संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे समोर आले. ही संरक्षक भिंत पुन्हा उभारण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते यांनी मागणी केली आता ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे त्यामुळे बेकायदेशीर उभारण्यात आलेले स्टॉल हटविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले पुन्हा या स्टॉल धारकांना संरक्षक भिंत उभारल्यानंतर स्टाॅल उभे करण्याची संधी मिळेल असेही आश्वासन दिले असल्याचे समोर आले आहे.
या बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या स्टॉल धारकांकडून मोठ्या प्रमाणात भाडेही आकारले जात होते. उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील स्टॉल उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित होते. मात्र ते नगरपालिकेच्या परवानगीने उभारण्यात आल्याचे खोटे सांगितले जात होते. आता उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणारे स्टाॅल हटविण्यात आल्यावर रस्ता मोकळा झाला आहे. आता संरक्षक भिंत उभारल्यानंतर पुन्हा स्टाॅल उभारतात किंवा कसे ? याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.