सावंतवाडी दि.१७ फेब्रुवारी
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार दि . १० जानेवारी रोजी कला – कार्यानुभव आणि विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले .
प्रशालेत कला -कार्यानुभव प्रदर्शन वर्गाचे उदघाटन पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री . योगेश चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विज्ञान प्रदर्शन वर्गाचे उद्घाटन पंचम खेमराज विद्यालयाचे प्राध्यापक श्री . प्रथमेश परब यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला तसेच त्यांनी बनविलेल्या कला – कार्यानुभव विषयातील विविध वस्तूंना , चित्रकलेला , विज्ञान प्रदर्शनाला भरभरून दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विज्ञान प्रदर्शन इ . ५ वी ते ७ वी या गटात कु. फरहान खान – प्रथम , कु . सोबिया शेख- द्वितीय , कु . आर्य माणगावकर- तृतीय , कु . जीशान शेख -उत्तेजनार्थ आणि इ . ८ वी ते १०वी या गटात कु . दानिया बंगलेकर – प्रथम , कु . प्रतिक्षा गावडे – द्वितीय , कु.- रिजा बेग तृतीय आले . विज्ञान प्रदशर्नाचे परिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. योगेश चौगुले व श्री . प्रथमेश परब यांनी केले.
या कार्यक्रमाला सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला
हेशागोळ ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी ,पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते .सर्वांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .