कणकवली दि .१७ फेब्रुवारी
कणकवली शहरातील एका दुकानदाराला शहरातीलच नाजूक प्रकरणात त्या प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेच्या भावकिने चांगलाच चोप दिला.ही घटना बाजारात घडली.
याबाबत वृत्त असे की,शहरातील प्रतिष्ठित एका महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न त्या दुकानदाराने केला.त्यानंतर बुधवारी सकाळी त्या महिलेच्या भावकिने एकत्र येत त्या दुकानदाराला सकाळीच गाठत मारहाण करीत गळ्यात चपलांचा हार घातला.
या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद नसली तरी शहरात याबाबत जोरदार चर्चा आहे.