कणकवलीत शिवसेना नेते किरण सामंत यांनी माजी आ.परशुराम उपरकर यांची घेतली भेट

राजकीय वर्तुळात खळबळ ; माजी आमदार परशुराम उपरकर उद्या काय निर्णय घेणार? सर्वांचे लक्ष

कणकवली दि.१७ फेब्रुवारी(भगवान लोके)

राजकीय पटलावर किंगमेकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते,ते शिवसेना नेते, किरण उर्फ भैया सामंत यांनी आज कणकवलीत माजी आ.परशुराम उपरकर यांची निवासस्थानी भेट घेतली.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्यामुळे माजी आमदार परशुराम उपरकर शिवसेनेत प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मात्र,श्री .उपरकर समर्थकांचा उद्या होणाऱ्या कुडाळ मधील मेळाव्यात काय निर्णय घेणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.