ग्लोबल रक्तदाते संस्थेतर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धा

0

मालवण, दि .१२ जानेवारी

ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र या समुहाच्या सातव्या वर्षातील पदार्पणानिमित्त रक्तदान जनजागृती विषयावर स्वरचित राज्यस्तरीय ऑनलाईन खुली काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्लोबल काव्य गौरव पुरस्कार देऊन तसेच सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा डोंबिवली डायमंड्स रोटरी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट डॉ.राजेश विनायक कदम, मालवण मधील उद्योजक राजा शंकरदास, साईकृपा कंस्ट्रक्शन, कणकवलीचे राजेश मानकर, उच्च न्यायालयाचे ॲड.प्रदीप बाविस्कर, संस्थेचे पार्टनर हॉटेल मालवणी,मालवण/मंगलमूर्ती स्कुबा डायविग मालवण यांनी प्रयोजित केली आहे. ही स्पर्धा विनाशुल्क आहे. स्पर्धकाने स्वतः लिहिलेल्या रक्तदान विषयावरील कवितेच्या वाचनाचा व्हिडिओ बनवून २४ जानेवारी पर्यंत संयोजकांकडे पाठवावा. स्पर्धेचा निकाल २६ जानेवारी रोजी ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र या संस्थेच्या फेसबुक पेज वर प्रसारित करून स्पर्धेचे पारितोषिक वितरण येत्या २८ जानेवारी होणाऱ्या ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आयोजित भव्य रक्तदान शिबिर मध्ये केले जाईल. व्हिडिओ पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी मुंबई व इतर सहभागी स्पर्धकांनी सागर चव्हाण 9702836844, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील सहभागी स्पर्धकांनी अमेय देसाई 9404535273 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, कोकण, महाराष्ट्र, गोवा, ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.