चिंदर सेवा संघ, शिवप्रेमी यांचे आयोजन
आचरा,दि.१७ फेब्रुवारी (अर्जुन बापर्डेकर)
छत्रपती शिवाजी महाराजाच्यां पदस्पर्शाने पावन झालेला चिंदर गावचा मानबिंदू भगवंतगड किल्ला. या किल्ल्यावर चिंदर सेवा संघ गेली चार वर्षे शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करत आहे. यंदाही सोमवार 19 फेब्रुवारी रोजी भारतीय कॅरम महासंघ उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, आचरा मंडळ अधिकारी अजय परब, चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य, शिवप्रेमी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा होणार आहे.
चिंदर गावातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सामूहिक शिवस्पूर्थी गीत, पोवाडा सादर करणार आहेत. स्पर्धेसाठी तुर्या ग्रुप ऑफ आर्ट्स(मुंबई) सौजन्य-गणेश अपराज तसेच सिहंगर्जना ग्रुप आचरा यांच्या वतीने बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तरी शिवजयंती उत्सव सोहळ्यात आपण सहभागी व्हावे असे आवाहन चिंदर सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.