वेंगुर्ला,दि.१८ फेब्रुवारी
वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील श्री तांबळेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव २० फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त केळी, नारळ ठेवणे तसेच रात्रौ पार्सेकर द. ना. मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रौत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.