जिल्ह्याभरातून आलेल्या रील मोठ्या स्क्रीनवर केले जाणार सादरीकरण-अध्यक्ष संदीप साटम
देवगड,दि.१८ फेब्रुवारी
शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला जिल्ह्यातून उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला असून या स्पर्धेचा निकाल 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घोषित करण्यात येणार असून जिल्हाभरातून आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधारित रील सादरीकरण मोठ्या स्क्रीनवर केले जाणार आहेत. जिल्हाभरातून आलेल्या रील खरोखर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जुन्या आठवणी,प्रसंग साक्षात उभे केले आहेत. या रील आवर्जून पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम यांनी केले आहे.