मालवण नगरपरिषद रचना सहायक रिक्त पदी अखेर अधिकारी नियुक्ती…

0

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या मागणीला यश…

मालवण,दि.१२ जानेवारी
मालवण नगरपरिषद रचना सहायक रिक्त पदी राजस अरुण कुणकवळेकर यांची नियुक्ती राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

मालवण नगरपरिषदेमधील रचना सहायक हे पद गेले अनेक महिने रिक्त होते. कामकाजावर त्याचा परिणाम होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तरी रचना सहाय्यक हे पद तात्काळ भरून मिळावे. सदर रिक्त पद भरेपर्यंत पर्यायी कर्मचारी उपलब्ध करुन दयावा जेणेकरुन मालवण शहरातील नागरीकांची विहित मुदतीमध्ये कामे करण्यास सुलभ होईल. असे मागणी मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे केली होती. याबाबत दीपक पाटकर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याला यश आले आहे.

नगरपरिषद हद्दीमधील नविन इमारत बांधकामांना परवानगी देणे, भोगाधिकार प्रमाणपत्र, व्यवसाय नाहरकत दाखला, माहितीच्या अधिकारामधील विहित मुदतीमध्ये, माहिती देणे, झोन व भाग नकाशा, नकाशा वाचन करणे, प्रधानमंत्री आवास योजनेखालील प्रलंबित प्रकरणे या सारख्या खाजगी व शासकीय कामकाजावर विहित मुदतीमध्ये कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती . त्याचप्रमाणे महाराष्ट्र इमारत व इतर बाधकाम कामगार कल्याण मंडळाकडून योजना राबविण्यात
आलेली आहे त्या योजनेमधील बांधकाम कामगारास देण्यात येणारे शिफारस प्रमाणपत्र मुदतीमध्ये सादर करणे बांधकाम कामगार यांना शक्य होत नसल्याने सदर योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरीकांला घेणे अशक्य होते. वरील कामे लक्षात घेता “रचना सहायक” हे पद रिक्त असल्याने नागरीकांचा रोष इतर विभागामधील कर्मचा-यांना सहन करावा लागत होता.

अखेर राज्य शासनाने रचना सहायक पदी नियुक्ती दिली आहे. याबाबत दीपक पाटकर यांनी राज्य शासनाचेही आभार मानले आहेत.