मालवण बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण २२ मे रोजी

मालवण,दि. २१ मे

मालवण येथील पुनर्बांधणी केलेल्या एसटी बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा दि. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्य परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे.

हा लोकार्पण कार्यक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार ऍड. निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, महाराष्ट्रात राज्य परीवहन मंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (बांधकाम) दिनेश महाजन, मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता मिनल सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.