कणकवली येथे २४ रोजी पद्मश्री रमेश पतंगे यांच्याशी संवाद कार्यक्रम

कणकवली दि.१८ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली येथे स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये २४ फेब्रुवारी रोजी पद्मश्री रमेश पतंगे यांच्याशी संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून रमेश पतंगे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
पद्मश्री रमेश पतंगे हे विवेक या साप्ताहिकाचे संपादक राहिलेले असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.२५ फेब्रुवारी रोजी ५ वाजता त्याच ठिकाणी डॉ.सदानंद मोरे यांचे ‘महाराष्ट्र …काल आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
साहित्य संस्कृती मंडळ अध्यक्ष आणि गाढे अभ्यासक,विचारवंत डॉ. सदानंद मोरे हे लोकमान्य ते महात्मा….तुकाराम दर्शन…महाराष्ट्राची लोकधारा…कर्मयोगी लोकमान्य..अशा अनेक ग्रंथांचे लेखक असून आज विवेकवादी विचारधारेतील हे एक अग्रगण्य नाव आहे.
हे व्याख्यान स्वामी विवेकानंद सभागृह कणकवली येथे आयोजित केले आहे. नागरिकांसाठी ही एक वैचारिक मेजवानी आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.मिलिंद कुलकर्णी व विवेक मुतालिक यांनी केले आहे.