कणकवली दि.१८ फेब्रुवारी(भगवान लोके)
शि. प्र. मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे कनक नियत कालिक विभागाच्या वतीने वाड.मय लेखन कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेन्द्र मुंबरकर होते.कार्यशाळेच्या प्रमुख अतिथी लेखिका आणि कवयित्री डॉ. सई लळीत उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी विविध उदाहरणे देवून साहित्याचे लेखन कशा प्रकारे केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले. “ललित लेखनामध्ये खट्याळपणा, तसेच बोचरेपणा असतो.साहित्याचे लेखन करताना भरपूर वाचन करणे आवश्यक आहे ” असे सांगून विद्रोही कवी तुकाराम तसेच धग, एक होता कार्व्हर, आमचा बाप आणि आम्ही, मध्यरात्री नंतरचे काही तास हे आत्मकथन आणि’अशा अनेक पुस्तकांची उदाहरणे दिली. भारताचे भवितव्य युवा मुलांच्या हातात आहे असे प्रतिपादन केले.अखंड वाचनाने आपल्या जीवनात साहित्यिक समृद्धी निर्माण होते असेही त्यांनी सांगतले. त्या पुढे म्हणाल्या की,”एकाच जन्मामध्ये अनेक जन्म अनुभवण्याची संधी आपल्याला पुस्तकामुळे मिळालेली असते या गोष्टीचा आपण परिपूर्ण फायदा आपण घेतला पाहिजे.” यावेळी त्यांनी त्यांच्या
घरगुती, अध्यात्म या ललित लेखाचे वाचन त्यांनी केले व मालवणी कविताही सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. सी. सावंत यांनी केले.प्रास्ताविक प्रा. एस.आर. जाधव, अतिथी परिचय प्रा. सीमा हडकर, अध्यक्षीय भाषण प्रा. डॉ. मुंबरकर, आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. बी. व्ही. कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.