मसुरे,दि.१८ फेब्रुवारी(झुंजार पेडणेकर)
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे भरविलेल्या गावठी बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वस्तू विक्रीतून एकूण ३१ हजार रुपयांची उलाढाल झाली.
शालेय विद्यार्थ्यांना व्यावाहारिक ज्ञान मिळणे, व्यवसाय कसा करावा आदीची माहिती मिळण्याच्या उद्देशाने गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
गावठी बाजाराचे उदघाटन संस्था व्यवस्थापक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी केले. यावेळी संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, निलेश परुळेकर, संतोष लब्दे, विश्वास मुणगेकर, विजय पडवळ, संजय परूळेकर,
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम्.बी. कुंज, सहाय्यक शिक्षिका सौ.गौरी तवटे,प्रसाद बागवे, एन्. जी. वीरकर, हरिदास महाले, सुविधा बोरकर, सौ. रश्मी कुमठेकर, प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ. मिताली हिर्लेकर, प्रियांका कासले, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू, नामदेव बागवे ,स्वप्निल कांदळगावकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या गावठी बाजारामध्ये पुरणपोळी, नाचणीच्या भाताच्या ,तांदळाच्या शेवया, वडापाव, कांदा भजी, भेळ, ईडली सांबर, बेसुंदी, भाजलेल्या शेंगा, भुईमूग शेंगा, शेवग्याच्या शेंगा, पालाभाजी, मुळाभाजी, ओली मिरची, लिंबू सरबत, कोकम सरबत, कांदा पोहे, तांदळाचे वडे, तांदळाचे वड्याचे पीठ, गावठी तांदूळ, घावणे, चकली, वालीच्या शेंगा , गावठी वांगी, काजू, काजूचे गर, हापुस आंबे, कुळीथ पिठ आदीची दुकाने विद्यार्थ्यांनी बाजारामध्ये लावली होती.परिसरातील प्राथमिक शाळातील विध्यार्थ्यानी शिक्षकांसह बाजारास भेट दिली.