मसुरे,दि.१८ फेब्रुवारी(झुंजार पेडणेकर)
देवगड तालुक्यातील मुणगे येथील रिक्षा चालक-मालक संघ, व्यापारी आणि मित्र मंडळ यांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्त
सकाळी ९.३० वा. शिवजयंती कार्यक्रम,
सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापुजा, ११ वा. आरती व तिर्थप्रसाद, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा महाआरती, रात्री ८ वा. संगीत भजने रात्रौ १० वा.श्री गणेश भवानी दशावतार नाट्य मंडळ हुंबरठ- कणकवली
यांचे महान पौराणिक दशावतार नाटक
‘भक्तीची पुण्याई’
श्री देवी भगवती मंदिर, मुणगे येथे होणार आहे. उपस्थिती चे आवाहन करण्यात आले आहे.