शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवलीत शिवजयंती उत्सव

शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचे आवाहन

कणकवली दि.१८फेब्रुवारी (भगवान लोके)

कणकवली शहर शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर यांनी केले आहे.

सायंकाळी ४ ते ६ वाजता हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. गांगोवाडी,टेंबवाडी,बाजारपेठ आणि सोनगेवाडी या वार्डाचा हळदीकुंकु समारंभ आयोजित करण्यात आला आहे.रात्री सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. .या कार्यक्रमांना शिवसैनिकांनी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला जिल्हाप्रमुख सौ.निलम ताई पालव , दिव्या साळगावकर साक्षी आमडोसकर यांनी केले आहे. रात्री सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.