पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा शुभारंभ खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते

देवगड,दि.१८ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील देवगड तालुक्यातील १० कामांपैकी २ कामांचा शुभारंभ रविवारी करण्यात असून अन्य रस्त्याच्या कामांचा शुभारंभ केला जाणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील फेज २ मधील रस्ते बिहार येथे झाले नाही म्हणून महाराष्ट्रातही सुरू करण्यात आले नव्हते.या बाबत अन्य खासदार समवेत संबंधित केंद्रीय मंत्री महोदय यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात आला व देवगड तालुक्यातील दोन रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आल्याची खासदार विनायक राऊत यांनी बोलताना दिली.
या रस्ते विकास कामांत वरेरी पाळेकर वाडी धरणेवाडी हा ३ किमी लांबीचा रस्ता,२.३० कोटी ,तसेच फणसगाव धारांबा गढिताम्हणे हा ४/७०रस्ता रु २.६० कोटी खर्च यांचा समावेश आहे.
या रस्ता शुभारंभ जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला .या प्रसंगी खास.विनायक राऊत,संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,जिल्हा प्रमुख संदेश पारकर,युवासेना जिल्हा अध्यक्ष सुशांत नाईक,उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे,राजू राठोड,सचिन सावंत,महिला संघटक सायली घाडीगांवकर तालुका प्रमुख मिलिंद साटम,उपातालुका प्रमुख बुवा तारी,नगरसेवक तेजस
मामघाडी,संतोष तारी रवींद्र जोगल,युवासेना अधिकारी गणेश गावकर फरीद काझी,माजी नगरसेवक विकास कोयंडे, महेंद्र भुजबळ,योगेश गोळम फनेंद्र लाड,केतन खाडये व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.