तळेरे,दि.१८ फेब्रुवारी
स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना सिंधुदुर्ग व संजय नकाशे मित्रपरिवार कासार्डे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोमवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी कासार्डे तिठ्ठा येथे आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्त सकाळी १० वा. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा व अभिषेक, १०:३० वा. स्वीटलँड इंग्लिश मिडीयम स्कूल तळेरे यांचे मैदानी खेळ,११ वा. निलेश चव्हाण तळेरे वाघाचीवाडी यांचा शिवचरित्रावरील पोवाडा, सायं.३ ते ५ हळदीकुंकू समारंभ, सायं. ५ ते ९ बुवा योगिता पवार, कुडाळ- वर्दे विरूद्ध बुवा स्वराली नाटेकर- देवगड यांचा महिला डबलबारी भजनांचा जंगी सामना, रात्रौ १० वा. बुवा उदय पारकर, कासार्डे विरूद्ध बुवा मोहन वारंग, दहिसर विरूद्ध बुवा राजेंद्र मोंडे ,मोंड याच्या तिरंगी भजनांचा जंगी सामना होणार आहे.तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


