राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महिला आघाडी म्हणून कणकवली येथील संगीता पाटील यांची निवड

तळेरे,दि.१८ फेब्रुवारी

राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र यांच्या राज्य संचालिका महिला आघाडी म्हणून कणकवली येथील संगीता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने राज्यातील तळागाळातील अपंगापर्यत शासकीय योजनांची माहिती देऊन सर्व अपंगाना सक्षम करावे हा उद्देश बाळगून काम करणार असल्याचे निवडीअंती संगीता पाटील यांनी सांगितले.