मालवण ,दि.१८ फेब्रुवारी
शेगावनिवासी श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन सोहळा रविवार दिनांक ३ मार्च रोजी मालवण एसटी स्टॅंड नजीकच्या श्रीराम मंदिर येथे विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे.
मालवण येथील एसटी स्टॅंड नजीकच्या श्रीराम मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे शेगावनिवासी श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन सोहळा यावर्षीही साजरा करण्यात येणार आहे या सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक ३ मार्च रोजी सकाळी ५:३० ते ६ वाजेपर्यंत सनई चौघडा, सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण, सकाळी ८ वाजता श्री गजानन महाराजांची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व नैवेद्य, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत झुणका भाकरी प्रसादाचे वाटप, सायंकाळी ४ वाजल्यापासून तिर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता अष्टपैलू कलानिकेतन मालवण यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ७ वाजता शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या लिलाचरित्र वर्णन असलेल्या श्री गजानन विजय ग्रंथावर आधारीत स्थानिक कलाकारांचा ट्रिकसीन, रात्रौ ८ वाजता दशावतारी दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या स्त्री रूपातील देवी अन्नपूर्णेची महती सांगणारा पौराणिक ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘स्वामी अन्नपूर्णा’ हा सादर करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.