मालवण,दि.१८ फेब्रुवारी
ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून कट्टा येथील वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये शंभर टक्के निकालसह यश संपादन करताना एलिमेंटरी परीक्षेत रुद्राक्ष दिलीप मेस्त्री राज्य गुणवत्ता यादीमध्ये ५५ वा तर स्वराली विनय ताम्हणकर राज्य गुणवत्ता यादीमध्ये ८६ वी आली आहे
या प्रशालेत एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत स्वराली विनय ताम्हणकर, माऊली प्रसाद थवी, धृवी महेश भाट, हर्षिता प्रकाश कानुरकर, हर्षल प्रकाश कानूरकर, करण विजय पाताडे, गौरव काशिनाथ पाताडे, रुद्राक्ष दिलीप मेस्त्री, वैष्णवी महादेव चव्हाण, संचिता संजय शिरवणकर हे विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले तर मयुरीका अमित मांजरेकर ही विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली.
इंटरमिजिएट परीक्षेचा निकालही शंभर टक्के लागला असून यामध्ये प्रतीक्षा भरत पवार, श्रेया समीर चांदरकर, हर्षदा किसन हडलगेकर, रिया विशेष भगत, धनश्री दिवाकर चव्हाण, ममता महेश आंगचेकर, ईश्वरी विष्णू रावले, सुजल सिताराम परब, मिताली मंगेश चव्हाण हे विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले तसेच सानिका सुभाष मोडकर, साक्षी रवींद्र नाईक, गंगुताई गंगाराम पाटील, स्वाती नंदकुमार मिठबावकर, गायत्री संजय कांबळे, देवदत्त धनंजय गावडे, साहिल चंद्रकांत खोत, संकल्प संजय पेंडूरकर, विराज विजय मेस्त्री, वैभवी बाळकृष्ण गावडे, जयुश प्रदीप चव्हाण, शुभम महेंद्र जांभवडेकर, अथर्व मंगेश गायकवाड, मनीष संजय चव्हाण, अमृत विठ्ठल गावडे हे विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर अशोक चांदरकर, सहाय्यक शिक्षक भूषण गावडे यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- कर्नल (सेवानिवृत्त ) शिवानंद वराडकर, ऍड.एस एस पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव-सुनिल नाईक, विजयश्री देसाई यांच्यासह सर्व संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधिर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .