मालवण,दि.१८ फेब्रुवारी
मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्ष सोडल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला काही फरक पडणार नाही. उलट जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले राजीनामा सत्र ही चांगली बाब असुन हे कार्यकर्ते मनसे पक्षाशी प्रामाणिक कधीच नव्हते. त्यामुळे कधीच पक्षाशी एकनिष्ठ नसलेले कार्यकर्ते राजीनामा देणार असतील तर आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करणार असल्याची प्रतिक्रिया मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.