कणकवलीत रिक्षाचालक वासुदेव देवलकर यांचा प्रामाणिकपणा…

रस्त्यावर सापडलेला ४५ हजारांचा मोबाईल दिला पोलिसांकडे ; पोलिसांनी दिला संदीप हंगे यांच्या स्वाधीन..

कणकवली दि.१८ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवलीत रिक्षाचालक वासुदेव शंकर देवलकर रा. तरंदळे पटेलावाडी यांना सुपारीबाग समोर रस्त्यावर वनप्लस कंपनीचा ४५ हजार किंमतीचा मोबाईल आज सकाळी १० वाजता आढळला होता.त्यांनी रस्त्यावर सापडलेला ४५ हजारांचा मोबाईल पोलिसांकडे आणून दिला.पोलिसांनी मोबाईल पाहिल्यानंतर आलेल्या मोबाईल नंबर वर फोन करुन चौकशी केली असता तो मोबाईल प्राथमिक शिक्षिका सुलोचना संदीप हंगे रा. जाणवली यांचा असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर तातडीने पती संदीप हंगे यांना पोलिसांनी बोलावत तो मोबाईल स्वाधीन केला.यामुळे रिक्षाचालक वासुदेव देवलकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी ठाणे अंमलदार पोलीस हवालदार अमित खाडये,रिक्षाचालक वासुदेव देवलकर उपस्थित होते.