देवगड पोलीस ठाणे प्रभारीपदी एपीआय मनोज पाटील यांची नियुक्ती

देवगड दि.१८ फेब्रुवारी

देवगड पोलीस ठाण्याच्या रिक्त प्रभारीपदी एपीआय मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून एपीआय मनोज पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. एपीआय मनोज पाटील हे कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पीआय अमित यादव यांची बदली झाल्यानंतर मनोज पाटील यांनी कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर अलीकडेच रिक्त असलेल्या देवगड पोलीस ठाणे प्रभारी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आदेश काढले होते. त्यानुसार पाटील यांनी देवगड पोलीस ठाण्याचा प्रभार स्वीकारला आहे.