आचिर्णे तेलीवाडी येथील प्रकाश जाधव यांनी आजारपणामुळे आलेल्या नैराश्येतून तणनाशक प्याल्याने उपचारात दरम्यान निधन

वैभववाडी,दि.१८ फेब्रुवारी
आचिर्णे तेलीवाडी येथील प्रकाश धाकू जाधव वय ६१ या वृद्ध इसमाने आजारपणामुळे आलेल्या  नैराश्येतून तणनाशक प्याल्याने उपचारात दरम्यान त्यांचे कणकवली येथे खाजगी रुग्णालयात शनिवारी राञी ८.३० वा. निधन झाले आहे.  या घटनेची खबर  मयताचा मुलगा प्रमोद प्रकाश जाधव याने कणकवली पोलीस स्टेशन येथे दिली आहे. या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस स्टेशन कडे आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश धाकू जाधव व त्यांची पत्नी आचिर्णे  तेलीवाडी येथे राहत होते.  त्यांचा मुलगा प्रमोद जाधव हा रोहा रायगड  येथे कामानिमित्त राहत आहे.
16 फेब्रुवारी रोजी दुपारी ३  दरम्यान मयताची पत्नी ही पती प्रकाश जाधव यांची औषधी गोळ्या आणण्यासाठी लोरे येथे गेल्या होत्या. यादरम्यान घरी पती एकटेच होते.  जाधव यांचे यापूर्वी एन्जोप्लास्टी झालेले होती.  ते आजारपण व डोकेदुखी मुळे त्रस्त होते. यातुन आलेल्या नैराश्यातुन त्यांनी गोठ्यात असलेले तन नाशक प्राशन केले.असल्याचे त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला व ते बाथरूम मध्ये उलट्या करीत होते. दरम्यान त्यांची पत्नी घरी आली व उलट्या का करता असे विचारले असता  आपण तणनाशक प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईक शेजारी आणि त्यांना लगेचच वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले तेथून प्राथमिक उपचार करून त्यांना कणकवली ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिथे उपचार करून त्यांना गोवा येथे घेऊन जाण्यास सांगितले. मात्र त्यांच्या मुलग्याने तेथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले उपचारा दरम्यान १७  फेब्रुवारी रोजी रात्री 8:20 च्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला शिंगाडे करीत आहे