ओवळीये येथील आपल्या मालकीच्या काजू बागायतीला पूर्व वैमनस्यातून आग

सावंतवाडी,दि.१८ फेब्रुवारी

ओवळीये येथील आपल्या मालकीच्या काजू बागायतीला पूर्व वैमनस्यातून आग लावून नुकसान केल्याची तक्रार राजेंद्र मधुकर नाईक यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
ओवळीये हद्दीत सर्वे नंबर ११०-३ मध्ये आपण सात वर्षांपूर्वी काजू लागवड केली होती,या ठिकाणी लगत कब्जेदार असलेल्या एका इसमाने जाणीव पूर्वक त्रास देण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता, न्यायालयाने त्याला माझ्या मालमत्तेत प्रवेश करू नये अशी ताकीद पण दिली होती,त्याच इसमांने सदरची आग लावली असल्याचा संशय राजेंद्र मधुकर नाईक यांनी व्यक्त केला आहे.