अतिक्रमण विरोधात उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिंबा

 सावंतवाडी,दि.१८ फेब्रुवारी
अतिक्रमण विरोधात उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. आज चौथ्या दिवशी उपोषणाला रुपेश राऊळ,बाळा गावडे,आबा सावंत यांनी भेट देऊन पाठिंबा असल्याचे सांगितले.
आंबोली पेरीचे भाटले येथे तसेच रायाचे भाटले येथील अतिक्रमण पाडून टाकण्यासाठी फौजदार वाडी,गावठण,रमाईनगर ग्रामस्थानी उपोषण सुरू केले आहे. चौथ्या दिवशी ही उपोषण सुरू आहे.
आज सायंकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गट रुपेश राऊळ,बाळा गावडे,आबा सावंत यांनी भेट देऊन भूमीपुत्रांच्या उपोषणाला पाठींबा असून शासनाने दुर्लक्ष केले आहे त्यांनी या ठिकाणी जबाबदारीने निर्णय घ्यावा अन्यथा काही घडल्यास पूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल असे सांगितले.
यावेळी विभाग प्रमुख बबन गावडे,संतोष पाताडे,प्रकाश गुरव, झिला गावडे,दाजी गुरव,प्रशांत गावडे,दत्ताराम जाधव,मनोहर जाधव, लाडू नाटलेकर,डेमा जाधव,शिवराम गावडे,झिपा सावंत,सरस्वती परब, जिजाबाई सावंत,रोहिणी गुरव,सुनंदा मोहिते,प्रवीण राऊत,अभिजित राऊत,किरण राऊत,रामा राऊत,पांडुरंग गावडे,प्रथमेश गावडे,लिंगराज राऊत,शंकर गावडे,प्रदीप गावडे,अरुण गावडे तसेच महिला वर्ग उपस्थित होते.