भाजप नेते निलेश राणे,उद्योजक किरण उर्फ भैया सामंत, बिग्रेडियर सुधिर सावंत यांची प्रमुख उपस्थिती
आचरा,दि.१८ फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मालवण तालुक्यातील आचरा तिठा येथे सॊमवार 19 फेब्रुवारी रोजी शिवसेना (शिंदे सेना) पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त
सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन, सकाळी 10. 30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांनवर आधारित श्री.संदेश रावले प्रस्तुत-स्वरसंदेश कराओके म्युझियम शो-
सकाळी 11 वाजता आचरा मतदार संघातील आरोग्य सेविका व आशा सेविका यांचा सत्कार सोहळा, सकाळी 11 .30 वाजता आचरा मतदार संघातील प्राण्याच्या आयुर्वेदीक वैद यांचा सत्कार सोहळा, रात्रौ 10 वाजता आचरा मतदार संघातील भजनी बुवांचा तसेच आचरा- पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा, रात्रौ10 वाजता डबलबारीचा जंगी सामना- बुवा श्री. श्रीकांत शिरसाठ विरुद्ध बुवा श्री प्रथमेश चव्हाण रंगणार आहे.
या सोहळ्याला उद्योजक श्री. किरण उर्फ भैया सामंत, बिग्रेडियर माजी खासदार श्री सुधिर सावंत, माजी खासदार श्री. निलेश राणे, जिल्हा प्रमुख श्री. संजय आग्रे, महिला जिल्हा प्रमुख सौ. वर्षाताई कुडाळकर, विधानसभा प्रमुख श्री बबन शिंदे, तालुका प्रमुख श्री महेश राणे, आचरा सरपंच श्री. जॅरोन फर्नाडीस उपस्थित राहणार आहेत. तरी शिवभक्त, शिवसैनिक, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे,वआचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.