मालोंड येथील श्री देवी सतीचा वार्षिक जत्रोत्सव

मालवण,दि.१८ फेब्रुवारी

मालवण तालुक्यातील मालोंड गावातील श्री देवी सती आईचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि. २० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या साजरा होणार आहे.

यानिमित्त दि.२० रोजी मालोंड गावातील कुलदैवतांचे व ग्राम देवीदेवतांचे दिवसभर मानपान व निमंत्रण, दि.२१ रोजी संध्याकाळी जोगवा व रात्री गोंधळ, दि. २२ रोजी सकाळी ८ ते १२:३० कळस पूजन व श्रीदेवी सतीआई मंदिरावर कळसाची संपूर्ण पूजा विधी करून स्थापना दि. २३ रोजी श्री देवी सतीआईचा वार्षिक जत्रोत्सव, अंभ्यंगस्नान, अभिषेक, होमहवन, सत्यनारायण महापूजा, आरती, प्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी हळदीकुंकू, रात्री सुस्वरभजन, पालखी सोहळा, दशावतारी नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत.
दि. २४ रोजी सांगता समारंभ होणार आहे. तरी सर्व प्रभुकुळ विस्तार बंधू भगिनींनी आणि गावातील भक्तगण यांनी उपस्थित राहून कळस दर्शन आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभुकुल विस्तार संस्था अध्यक्ष पांडुरंग मालाडकर आणि सरचिटणीस सदा मालाडकर यांनी केले आहे.