करंजे मतिमंद विद्यालयाला जीवनावश्यक वस्तू भेट

0

सामाजिक बांधिलकी जोपासत सेवानिवृत्त एलआयसी अधिकारी हरी चव्हाण यांच्याकडून भेट

कणकवली दि.१२ जानेवारी
करंजे मतिमंद विनाअनुदानित विद्यालयाला एलआयसी सेवानिवृत्त अधिकारी हरी चव्हाण यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली.यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत हरी चव्हाण यांनी विनाअनुदानित असलेल्या या विद्यालयास काही वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या.यावेळी हरी चव्हाण यांचा शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी करंजे कुंभारवाडी येथील मतिमंद महाविद्यालय येथे पालक शिक्षक संघाचे सतीश माजगावकर, सानिका वावळीये, चंद्रकला करंजेकर, रश्मी नीगवेकर, ममता घोणे, मुख्याध्यापक आणि शिक्षक श्री. गोंदके आदी उपस्थित होते.

मतिमंद मुलांची शाळा करंजे प्रशालेस तेल,साखर,चहा पावडर सह ४० किलो कडधान्ये , मूग ५किलो, हिरवे वाटाणे ५किलो,मटकी ५किलो, चवळी ५किलो, मसूर ५ किलो, मसूर डाळ ५ किलो,मुगडाळ ५ किलो, साखर ५ किलो, चहा १किलो, तेल ५लिटर कडधान्ये सहीत तेल, साखर चहापावडर सुपूर्द करण्यात आले.

शाळेच्या वतीने श्री कांबळे, ललित राणे आणि शालेय कर्मचारी उपस्थित होते.तसेच देणगी देण्यामध्ये समन्वय साधला त्याबद्दल मंगेश साळसकर यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला.