तळेरे,दि.१९ फेब्रुवारी
राज्यस्तरीय बाल विज्ञान प्रदर्शन सावंतवाडी येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नव्याने निवड झालेल्या आकाश तांबे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीकृष्णकांत पाटील ( शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ,पुणे), महेश चोथे (शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग), प्रदीपकुमार कुडाळकर- शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), राजेंद्र कांबळे ( प्राचार्य, डाएट सिंधुदुर्ग), वामन तर्फे (अध्यक्ष मुख्याध्यापक संघ ), गुरुनाथ कुसगावकर (कार्यवाह ) , श्री. काकतकर (अध्यक्ष सिंधुदुर्ग विज्ञान मंडळ ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झालेल्या सत्कार हा सर्वात मोठा आहे असे आकाश तांबे यांनी या वेळी सांगितले. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी केल्याबद्दल जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या यावेळी सन्मान करण्यात आला हा सन्मान करण्याचा बहुमान देखील कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे यांना देण्यात आला. त्याबद्दल त्यांनी सर्व मान्यवरांना व आयोजकांना धन्यवाद दिले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे व कार्यवाह गुरुनाथ कुसगावकर यांनी सुद्धा आकाश तांबे यांचा सत्कार केला.
यावेळी आकाश तांबे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.