तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला उत्साहात प्रारंभ….
देवगड,दि.१९ फेब्रूवारी
जय भवानी…. जय शिवाजी…. छत्रपती शिवाजी महाराज की जय…. अशा घोषणांनी देवगड परिसर दुमदुमून निघाला होता देवगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव देवगड येथे उत्साहात सुरुवात झाली असुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन संदीप साटम व केदार सावंत व सौ हर्षदा सावंत या उभयतांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच ध्वजारोहण सोहळा सुंदर जगताप यांच्या हस्ते पार पडला.
या नंतर भव्य शोभायात्रा शुभारंभ देवगड सडा ते देवगड बाजारपेठ ते देवगड किल्ला या मार्गावर सजविलेल्या रथातून छत्रपती शिवराय यांचा पेहराव करुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी संदीप साटम,अविनाश सावंत,दयानंद पाटील योगेश राणे,किसन सूर्यवंशी,राजू पाटील,मिलिंद माने,नंदू देसाई ,शरद ठुकरुल,तुषार पाळेकर,सदानंद सावंत संजीव राऊत,राजू भुजबळ,शामराव पाटील,अमित कदम,सूर्यकांत पाळेकर,बंटी कदम,ऋतिक धुरी,चंद्रहास मर्गज,सुदाम मोरे,शेखर गोळवणकर,संजय तारकर,शंकर पाटील,सौ तन्वी शिंदे,सौ नंदिनी कोयघाडी सौ शीतल जोईल व अन्य शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.देवगड तालुका मराठा समाजाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले