वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे

वेंगुर्ले,दि.१९ फेब्रुवारी
वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या असून सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा अँड. रेवती राणे व वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या हस्ते पद नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली.
येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमांत जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सुप्रिया परब, शहर उपाध्यक्ष विश्राम उर्फ संदेश रगजी, युवक शहर अध्यक्षपदी नितीन तेली, महिला शहर अध्यक्षपदी दीपाली गावडे, वेंगुर्ले शहर कार्यकारिणी सदस्यपदी शैलेश भोसले आदींना महिला जिल्हाध्यक्ष अँड. रेवती राणे, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या हस्ते महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल व जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कुबल यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.