मराठा समाजासाठी उद्याचा दिवस महत्वाचा ; कणकवली सकल मराठा समाज शिवजयंती उत्सवाला दिली भेट
कणकवली दि.१९ फेब्रुवारी(भगवान लोके)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो इतिहास केला आहे,त्याचा आदर्श घेवून आम्ही काम करीत आहोत.शिवजयंतीच्या निमित्ताने हा इतिहास नव्या पिढी समोर येत आहे.शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळे समाजामध्ये फिरताना अभिमानाने फिरतो आणि जो मानसन्मान आपल्याला मिळतोय.उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. महायुती सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावलं आहे,आमचे सरकारे आपल्या समाजाला टिकणारे आरक्षण देणार असल्याचे प्रतिपादन भाजपा आ.नितेश राणे यांनी केले.
कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.यावेळी सकल मराठा समाजाचे डॉ.चंद्रकांत राणे,प्रा.जी. ए.सावंत,ऍड.उमेश सावंत,भाई परब,आ.राणे यांची पत्नी नंदिता राणे, सोनू सावंत,सुशील सावंत, अभय राणे,बँक संचालक विठ्ठल देसाई,समीर सावंत,महेश सावंत,बबलू सावंत,महेंद्र सांबरेकर, डॉ.विद्याधर तायशेट्ये,शिक्षक अनंत राणे,सुशांत मर्गज,श्याम सावंत,श्यामसुंदर दळवी,सूर्यकांत वारंग,शैली सावंत , स्वाती राणे , सायली सावंत , विभा सावंत , आदिती मालपेकर,पत्रकार सुधीर राणे,संतोष राऊळ,भगवान लोके,लक्ष्मीकांत भावे,दर्शन सावंत,तुषार हजारे,बच्चू प्रभूगावकर,शेखर राणे आदींसह मराठा समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव,शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे,पत्नी नंदिता राणे यांचा सत्कार करण्यात आला.
आ.नितेश राणे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज काय होते ? कोण होते ? हे प्रत्येक पिढीला समजलच पाहिजे अशा दृष्टीकोनातून आपण सर्वजण कार्यक्रम घेत आहात. महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत घेवून जाणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या शिवरायांमुळे आज आपण सगळीकडे अभिमानाने वागतो.आपण महाराजांचे मावळे म्हणून महाराजांचे अनुयायी म्हणून काम करीत आहोत.त्यांनी स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य म्हणून स्थापन केले. बहुजन समाज एकत्र होता, म्हणून आपण महाराजांकडे बघतो हिंदवी स्वराज बहुजन प्रतिपालक म्हणुन आपण त्यांच्याकडे पाहतो .ते बहुजनांचे हिंदवी स्वराज स्थापन करणा-यांचे होते. ही बाब आपण प्रत्येकाने आवर्जुन लक्षात ठेवली पाहिजे. आपण जेव्हा महाराजांना मराठ्यांचे राजे म्हणतो किंवा समाजाचे राजे म्हणतो,तेव्हा कुठे तरी त्यांना कमी करतो का?असा चुकीचा संदेश जाता कामा नये.त्याची काळजी घेतली पाहिजे.
राज्यातील महायुतीच्या सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावले आहे. मराठा समाजासाठी उद्या आनंदाचा दिवस ठरु शकतो.त्याच कारण अस आहे , आपल्या मराठा समाजाची मागणी प्रमाणे आरक्षण मिळेल.मराठा समाजाला शिक्षणाला आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे,हे राणे समितीने दिलेले १६ टक्के आऱक्षण कोर्टात टिकले नाही.कुठेतरी आपण कमी पडलो किंवा राष्ट्रीय व्यवस्था कमी पडली .पण आता मराठ्यांच हित, बहुजणांच हित पाहणा-यांच महाराष्ट्राच सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. आम्ही सर्वजण मराठा समाजाला आपल्या हक्काच आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. उद्याच्या अधिवेशनात भक्कम बाजू मी किंवा आपले पालकमंत्री रविंद्र चव्हाण असतील आम्ही निश्चितपणे भूमिका मांडू,हा विश्वास मी देतो.आपल्याला हक्काच आरक्षण तेही कोर्टात टिकेल असे आरक्षण द्या,अशी आमची भूमिका होती.त्यामुळे आपल्याला उद्याचा दिवशी बारकाईने लक्ष ठेवावा लागेल.हक्काच आरक्षण जाहीर होईल,तेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाच मोठा जल्लोष कुठे होईल.तर तेव्हा मी हक्काने सांगेन की आमच्या कणकवली आणि सिंधुदुर्ग मध्ये ,अशी अपेक्षा आ.नितेश राणे यांनी व्यक्त केली.