कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज यांना आ.नितेश राणेंनी केलं अभिवादन ;कणकवली छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ आयोजित कार्यक्रमास दिली भेट
कणकवली दि.१९ फेब्रुवारी(भगवान लोके)
शिवजयंती निमित्त शिवरायांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण एकत्र येतो.३५० वर्षानंतरही महाराजांचा इतिहास आठवत आहे,कारण एवढा मोठा इतिहास राजांनी घडवला आहे.रयतेचे राज्य कसे असावे, त्यानुसार आम्ही कार्यरत असतो.छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याचा विश्वास आ.नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत आ.नितेश राणेंनी अभिवादन केले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष
अध्यक्ष विद्याधर तायशेट्ये,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,बँक संचालक विठ्ठल देसाई,अशोक करंबळेकर,महेश सावंत, आनंद पारकर , अण्णा कोदे,चेतन मुंज ,ज्ञानेश्वर दीपनाईक , समीर प्रभूगांवकर , सुहास सावंत , बबलू देसाई,गुरुनाथ पावसकर आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.यावेळी आ.राणे यांचा सत्कार करण्यात आला.