Air India Flight Crash : अपघातानंतर एअर इंडियाचा सर्वात मोठा निर्णय

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून यात 241 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबाद ,दि.१२ जून

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली आणि यात सर्व प्रवासी जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. आता अपघातानंतर एअर इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI171 अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळल्यानंतर विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणे तात्पुरते थांबवण्यात आली आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागला. यानंतर एअर इंडियाने या अपघातानंतर मोठा एक निर्णय घेतला आहे.

प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय

एअर इंडियाने कंपनीने १२-१४ जून २०२५ दरम्यान अहमदाबादहून प्रवास करणाऱ्या किंवा अहमदाबादला येण्यासाठी तिकीट बुक केलेल्या प्रवाशांसाठी रीशेड्युलिंग फी आणि तिकीट वाढल्याने द्यावे लागणारे जास्त भाड्याची रक्क माफ करण्याची घोषणा केली आहे. १२ जून २०२५ पर्यंत जारी केलेल्या तिकिटांसाठी हे लागू आहे. तसेत जे लोक बुकिंग रद्द करू इच्छित आहेत, त्यांचीही कॅन्सलेशन फी माफ केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या देशाचे किती प्रवासी?

एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहानमुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता अशी माहिती समोर आली आहे.

अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

या विमान अपघाताबाबत अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना सांगितले की, ‘अपघातग्रस्त एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमानात कोणीही वाचले नसल्याचे दिसून येत आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करत होते. ते लंडनला जाणार होते. मात्र, टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानाला एका निवासी भागात अपघात झाला. या विमानात पायलट आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते.’

अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवाशी जिंवत बचावल्याचे समोर आले

अहमदाबादमधील मेघानीनगर भागात विमानाचा भीषण अपघात घडला. अहमदाबादवरुन लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे बोललं जात होतं. मात्र आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवाशी जिंवत बचावल्याचे समोर आले आहे.

पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती जिवंत बचावली आहे. रमेश विश्वासकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. यामुळे विमानातील अजून काही लोक जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचावकार्य वेगाने आणि पूर्ण ताकदीने सुरू आहे.