कणकवली दि.१९ फेब्रुवारी (भगवान लोके)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कणकवली येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक , छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,आनंद पारकर, चेतन मुंज यांनी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत रिजा नाईक शहर अध्यक्ष इम्रान शेख प्रांतिक सदस्य विलास गावकर, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णी,शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर गुरुजी, जिल्हा सचिव सतीश पाताडे,जाहीर फकीर, आदी उपस्थित होते.