सावंतवाडी,दि.१३ जून
कोकण रेल्वेच पावसाळी वेळापत्रक जाहीर झालं आहे. १५ जून पासुन सावंतवाडी ते मुंबई व मुंबई ते सावंतवाडी अस मान्सून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकाहून सावंतवाडी- दिवा दररोज ८.४० वा., मडगाव – बांद्रा गुरूवार- शुक्रवार ९.०० वा., मांडवी एक्स्प्रेस दररोज १०.०० वा., गांधीधाम एक्सप्रेस (सीएसएमटी) दररोज १०.०० वा., गांधीधाम एक्सप्रेस बुधवारी १२.१८ वा., मडगाव -एल.टी.टी सोमवार- शनिवार १२.५२ वा., जनशताब्दी एक्स्प्रेस दररोज १३.४२ वा., मडगाव – पुणे मंगळवार-शुक्रवार, १७.२२ वा., तुतारी एक्स्प्रेस दररोज १७.५५ वा., कोकणकन्या दररोज १९.३२, वास्को पाटणा बुधवारी २१.४२ वा., मडगाव – नागपूर गुरुवार-रविवार २०.२० वा., मंगळूर- उधना बुधवार- शुक्रवार ६.४२ वा. सुटणार आहे.तसेच सावंतवाडी स्टेशनकडे दिवा-सावंतवाडी दररोज १८.५० वा., मडगाव-बांद्रा बुधवार-शुक्रवार १९.३२ वा., मांडवी एक्स्प्रेस दररोज १९.०२ वा., गांधीधाम एक्सप्रेस शनिवारी ८.२० वा., एलटीटी – मडगाव शुक्रवार-रविवार ११.५२ वा., जनशताब्दी एक्स्प्रेस दररोज १४.४४ वा, पुणे-मडगाव सोमवार-मंगळवार ५.००वा., तुतारी एक्स्प्रेस दररोज १२.५० वा, कोकण कन्या सुपर फास्ट दररोज ८.४८ वा., पाटणा- वास्को मंगळवारी २.०० वा, नागपूर-मडगाव मंगळवार- रविवार १३.४२ वा तर उधना- मंगळुरू सोमवार-गुरूवार १०.१२ वा. असणार आहे.