तळेरे,दि.१९ फेब्रुवारी
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका संघटनेच्या वतीने शिव जयंती उत्सवाच्या निमित्ताने छ. शिवाजी महाराजांच्या कणकवली येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हमीदभाई पिरखान, कणकवली तालुकाध्यक्षा सौ.संजना सदडेकर, उपाध्यक्ष सदाशिव राणे, डॉ.हर्षद पटेल, कणकवली तालुका संघटक मंगेश चव्हाण, पत्रकार दिलीप हिंदळेकर आदी उपस्थित होते.