राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान बंद ; मी हिंदूंची बाजू घेतोय हे चुकीचं आहे का?
कणकवली,दि.१९ फेब्रुवारी
राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान आता बंद होत नफरत चे दुकान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरात अनेक प्रवेश होत आहेत.देशात मोदींची गॅरंटी चालते हे दिसून येत आहे.त्यामुळे कोणाला अजून धक्का बसला तर नवल वाटू नये.विजय वडेट्टीवार यांनी माझ्या भाषणावर आक्षेप घेतला. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस वसुली साठी वापरले जायचे. महाविकास आघाडी च्या काळात पोलिस उद्धव ठाकरे चे घरगडी म्हनून वापरले जायचे.हे तुम्हाला दिसले नाही काय ? येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकच असतील,ते सागर बंगल्यावर असे सांगत वडेट्टीवार यांच्या प्रवेश करतील,असा सूचक इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.तसेच मी हिंदूंची बाजू घेतोय हे चुकीचं आहे का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले,विनायक राऊत यांची स्मरणशक्ती कमी झालीय. उद्धव ठाकरेंनी कोणत्या कडवट सैनिकांना मंत्रीपद दिली होती. राऊत यांनी स्वतःच्या बुडाखाली लागलेली आग विजवावी. विकृतीचे उत्तम दर्शन म्हणजे ठाकरे गटाची कणकवली येथे झालेली सभा होती. त्या सभेत तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि काही नेते जे पातळी सोडून बोलत होते त्याला विकृती म्हणतात. स्वतः आरशात पाहून घ्यावे मग कोणी पातळी सोडली आहे ती कळेल,अशी टीका नितेश राणे यांनी केली.
केसरकरांचा प्रश्न असला तरी यापूर्वी फडणवीस यांनी आरक्षण टिकवून दाखवलं होत. कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि ते टिकेल.पोलीस माझं काय वाकड करू शकत नाही ह्याचा अर्थ कोणाचा अपमान असा नाही तर जो ईशारा द्याचा तो त्यांना कळला. मी हिंदूंची बाजू लावून धरतो. जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी विचारेन,मी हिंदूंची बाजू घेतोय हे चुकीचं आहे का? मी कुठेही चुकीचं बोललो नाही. जो संदेश मला द्यायचा होता तो मी देत असल्याचं आ.नितेश राणे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांचा मित्र परिवार मोठा आहे. हिंदुत्वाचा विचार असलेले एकत्र आले तर चांगलंच होईल. त्याच विषयाला अनुसरून आशिष शेलार भेटले असतील. ओवेशी यांचेवर बोलताना म्हणाले ,मोदींजी अरबी भाषा बोलून लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. ओवेशीने कधी महाराष्ट्रात येऊन मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय का ? ओवेशी ज्या जिहाद्यांची बाजू घेऊन बोलत आहेत. त्याना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मान्य नाही. त्यांना या देशात शेरया कायदा आणायचा आहे.
ऑन इम्तियाज जलील याच्या बद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणले,जिहाद्यांची हिंदूंच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे असतील तर इम्तियाज जलील मुंबई कुठूनही निवडणूक लढवूदेत बुलडोझर कारवाई थांबणार नाही.