खारेपाटण जैन समाज तर्फे आचार्य विद्यासागर महाराज यांना विनयांजली

देवगड,दि.१९ फेब्रुवारी
संत शिरोमणी आचार्य १०८ प.पु. विद्यासागरजी महाराज यांना खारेपाटण येथील जैन समाजा कडून विनयांजली अर्पण करण्यात आली.या निमित्त आचार्य प.पु. विद्यासागरजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले -.व विनयांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी जैन समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र ब्रम्हदंडे,अनिल होनाळे,अजित पंडित,पपु पंडित ,गोटू पंडित,विशाल कावळे,नितीन होनाळे,पद्मावती महिला मंडळ अध्यक्षा सौ.विरा ब्रम्हदंडे,उपाध्यक्ष सौ दर्शना डोर्ले, व अन्य महिला सदस्य उपस्थित होत्या .अजित पंडित यांनी प्रास्तविक करून आचार्य विद्यासागर महाराज यांच्या जीवनावर सविस्तर माहिती देऊन त्यांचे कार्य विशद केले.