कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघातर्फे १५ रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

मालवण,दि.१४ जून

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांच्यावतीने भंडारी समाजातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दि. १५ जून रोजी दुपारी ३ वाजता ओम गणेश साई मंगल कार्यालय, माडये हॉल कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी ठीक ७ वाजता भंडारी समाजातील निवडक नामवंत दशावतारी कलाकारांचा रथी सारथी संग्राम हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन भंडारी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.