देवगड कुणकेश्वर येथे परिट समाजाच्यावतीने संत गाडगेबाबा जयंती व स्नेहमेळावा

सावंतवाडी,दि.१९ फेब्रुवारी
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी रोजी, श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ देवगड यांच्यावतीने श्री संत गाडगे महाराज जयंती व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंधू भगिनींच्या स्नेह मेळावा देवगड कुणकेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे.

श्री रामचंद्र बाळा धोंडू कुणकेश्वरकर रा .कुणकेश्वर, पावणाईदेवी मंदिर शेजारी, परिट समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी सकाळी ८.३० वा. श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसर व समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम, सकाळी १० वा. स्वागत समारंभ दीप प्रज्वलन सत्कार, सकाळी १०.३० वा.मान्यवरांचे मनोगत व अध्यक्षीय भाषण, दुपारी १ वा. महाप्रसाद, २.३० वा. महिलांसाठी हळदीकुंकू, दुपारी ३ वा. श्री संत गाडगे महाराज कलानिकेतन आंदूर्ले प्रस्तुत “गाडग्यातील शिदोरी” हा संगीत कार्यक्रम, सायं ४.३० वाजता आभार व समारोप अशा विविध कार्यक्रमाने संत गाडगे महाराज जयंती व स्नेह मेळावा साजरा करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, देवगड तालुकाध्यक्ष विजय पाटील(मो. बा.9421146323), सचिव शरद लाड व देवगड येथील पदाधिकारी यांनी केले आहे.