महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडविण्यासाठी १४ जानेवारीला कणकवलीत मेळावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी यावेळी महायुतीचा खासदार असेल
कणकवली दि.१२ जानेवारी (भगवान लोके)
राज्यात भाजपा , राष्ट्रवादी , शिवसेना असे महायुतीचे सरकार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत देश जागतिक महागुरु बनण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी महायुतीचा खासदार या लोकसभा मतदार संघातून दिला जाईल . गेल्या 10 वर्षापासुन विनायक राऊत यांच्या नावाचा कलंक आगामी लोकसभा निवडणूकीत महायुतीचे कार्यकर्ते पुसुन काढणार असल्याचा इशारा महायुतीचे संयोजक आ. नितेश राणे यांनी दिला. तसेच २ लाख मताधिक्य सांगताहेत. त्यांच्याकडे ना पक्ष.. ना चिन्ह आणि २ हजार कार्यकर्ते तरी राहिले आहेत का? असा सवाल करतानाच महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडविण्यासाठी १४ जानेवारीला कणकवलीत मेळावा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
कणकलली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर ,राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सरफराज नाईक, भाजप कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीचा विजय निश्चित असल्याने आमच्याकडे उमेदवारांची रांग लागली आहे. आमचे जिल्हाध्यक्ष भाजपचा उमेदवार मागत असतील तर योग्यच आहे. नरेंद्र मोदी यांच्या सोबत हा खासदार पाठवायचा आहे.महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्या वरिष्ठांना संदेश देण्यासाठी उमेदवार मागणीचा प्रयत्न करीत आहेत.त्या नुसार दावा केला जात असेल चुकीचे काय ? आमच्या नेत्यांकडे सर्वे आहेत.कुठला उमेदवार जिंकू शकतो. याचा निर्णय वरीष्ठ नेते घेतील. नरेंद्र मोदी ही देशाची गरज बनली आहे. देश विश्व गुरु बनविण्याचे स्वप्न साकार करायचे असेल तर नरेंद्र मोदी पाहिजेत.विकासासाठी नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे. उबाठा कडे पक्षच नाही , चिन्ह त्यांना मतदान करून काय करणार? नेहमी ठाकरे गट खा. विनायक राऊत कोकणच्या विकासाला विरोध करीत आहे. त्यामुळे आता हा खासदार महायुतीचा असेल. विनायक राऊत यांचा या निवडणूकीत पराभव निश्चित असेल्याचे आ. नितेश राणे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक महायुती म्हणून भाजपा , शिवसेना , राष्द्रवादी लढवणार आहोत. तिन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी १४ जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेण्याचे ठरवले आहेत.त्यासाठी तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकत्र आलेले आहेत.संयोजक म्हणून मला जबाबदारी दिली आहे.महायुती म्हणून नरेंद्र मोदींना समर्थन देणार आहोत. त्यासाठी १४ जानेवारी रोजी ११ वाजता भगवती मंगल कार्यालयात येथे महायुतीचा मेळावा होईल. त्याला तीन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपचे आ.प्रसाद लाड, राजन तेली, अतुल काळसेकर, येणार आहेत.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असणार आहेत. या मेळाव्यात महायुती कार्यकर्ते उपस्थित राहून एकीचा संदेश दिला जाईल असे आ. नितेश राणे यांनी सांगितले.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, भारताला विश्व गुरु बनविण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी या लोकसभेचा खासदार मोठ्या मताधिक्यांनी जिंकेल , त्याची तयारी म्हणुन १४ जानेवारीला मेळावा होत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे म्हणाले,आपल्या जिल्ह्यातील महायुतीचा मेळावा होत आहे.भाजपा नेते आणि आमचे नेते दीपक केसरकर,राष्ट्रवादी काँग्रेस नेते या मेळाव्याला येतील.लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत सर्वाधिक मतधिक्याने विजय असेल.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले , आमच्या प्रमुख नेत्यांनी धोरण ठरवले आहे,आमचे संयोजक नितेश राणे आहेत.राष्ट्रवादीने अजित पवार यांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतक महायुती पहिला मेळावा होत आहेत.सगळ्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.
शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आदेश दिला,त्याप्रमाणे कणकवलीत सभा होत आहे.या लोकसभा निवडणूकीत महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे. महायुती पार्लमेंट बोर्डाचा निर्णय होईल तो उमेदवार असेल.त्यांना विजयी करण्यासाठी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते ईर्षेने काम करतील.
राष्ट्रवादी कार्याध्यक्ष काका कुडाळकर म्हणाले,१४ जानेवारीला मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मेळावा आहे. मकरसंक्रांतीचा गोडवा यावा यासाठी ही सभा आहे.जेणे करुन आगामी काळात महायुतीच्या विजयाची नांदी ठरेल.